संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पब्जी खेळण्यावरुन वाद झाला! तरुणाची विष पिऊन आमहत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर- जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील घानवडे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. पब्जी गेम खेळण्यावरुन घरातल्या लोकांशी वाद झाल्याने तरुणाने विष प्राशन करून जीवन संपल्याचे समोर आले आहे. हर्षद डकरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

हर्षद हा कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील घानवडे गावात राहत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला पब्जी खेळण्याचे व्यसन लागले होते. पब्जी खेळण्यावरून त्याचे घरात वारंवार वाद होत होते. या वादातूनच हर्षद याने विष प्राशन केले. कुटुंबातील सदस्यांना याबाबत समजल्यानंतर त्यांनी हर्षद याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच हर्षद याचा मृत्यू झाला. पब्जी गेमच्या नादाने तरुणाला प्राण गमवावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पब्जी गेम खेळणार्‍यांची संख्या मोठी आहे, यातील तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. गेम खेळण्याच्या नादात सध्या तरुण इतके गुंग होऊन जातात की त्यांना कशाचच भान राहत नाही, हे या घटनेवरुन अधोरेखित होत आहे. त्यामुळे गेमिंग करणार्‍या तरुणांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami