संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

पनवेल-कर्जत मार्गावर उभारला जातोय सर्वांत जास्त लांबीचा बोगदा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वात जास्त लांबीचा ठाणे-दिवा दरम्यानचा १३०० मीटर लांबीचा पारसिक बोगदा आहे.मात्र,आता पारसिक बोगद्यापेक्षा सर्वधिक लांबीचा बोगदा पनवेल-
कर्जत दरम्यान उभारण्यात येणार आहे.पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावर नव्याने मार्गिका टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे.या दुहेरी रेल्वे मार्गाच्या कामानिमित्त तीन बोगदे तयार केले जाणार आहेत.यांपैकी एक वावर्ले येथील बोगदा २६०० मीटर लांबीचा तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुभाषचंद्र गुप्ता यांनी दिली आहे.

पनवेल ते कर्जत सध्या एकच रेल्वे मार्ग असल्याने मेल,एक्सप्रेस आणि मालवाहतुक याच मार्गावरुन हाेते.कर्जत आणि पनवेलमधील प्रवाशांसाठी व्हाया ठाणे किंवा कुर्ला मार्गाने लोकलने जावे लागते.रस्ते मार्ग अतिशय वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने पनवेल ते कर्जत अशी थेट लोकल सुरु करण्याची मागणी प्रवाशांची आहे.त्यासाठी येथे एमयूटी ३ अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्ग हाती घेतला आहे.या प्रकल्पामुळे कर्जत आणि पनवेल येथील प्रवाशांसाठी सुखकर होणार आहे.सध्या सीएसएमटीहून कर्जतला जाणाऱ्या प्रवाशांसाठी,पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग तयार झाल्यास, सीएसएमटी-कर्जत व्हाया पनवेल रेल्वे मार्गाचा पर्याय तयार होईल.तरी आता पनवेल-कर्जत दरम्यान वावर्ले येथील किमी लांबीचा बोगदा मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबी बोगदा असणार आहे.या बोगद्याच्या उभारणीस सुरुवात झाली आहे.

मार्च २०२५ पर्यंत या बोगदा प्रकल्पाचे काम होण्याची शक्यता आहे.या रेल्वे मार्गावर नढाळ,किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे तयार केले जाणार आहेत.त्यातील नढाळ- २१९ मीटर लांब, किरवली-३०० मीटर लांब आणि वावर्ले हा तब्बल २६०० मीटर लांबीचा बोगदा असणार आहे.तसेच या बोगद्याव्यतिरिक्त या मार्गावर दोन उड्डाणपूल असणार आहेत.यातील कर्जत जवळचा उड्डाणपूल १.२२५ मीटर आणि पनवेलजवळचा उड्डाणपूल हा १.३७५ मीटरचा आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या