संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 01 February 2023

पनवेलमधील 300 वर्ष जुना पेशवेकालीन वाडा जमीनदोस्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पनवेल- पनवेल शहरातील ऐतिहासिक वाडे ही शहराची एक ओळख आहे. कालांतराने या वाड्यांची जागा टोलेजंग इमारती घेत आहेत. यापैकीच एक असलेला 300 वर्ष जुना पेशवेकालीन बापटवाडा पालिकेने जमीनदोस्त केला आहे. हा वाडा धोकादायक असल्याने पालिकेने दीड महिन्यांपूर्वी नोटीस बजावली होती. त्यानंतर पोलिसांच्या फौजफाट्यासह हा वाडा जमीनदोस्त केला. गौरवशाली इतिहास असलेला वाडा पडताना पाहून नागरिक मात्र हळहळले.

तलावांचे शहरासोबत वाड्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या पनवेल गावात पेशवेकालीन इतिहासाच्या खूना आजही आहेत. शहर होण्यापुर्वी गाव असलेल्या पनवेल शहरात अनेक वाडे होते. विकासाच्या लाटेत हे वाडे जमिनदोस्त होऊन भौगोलिक विस्तारासाठी जमीन अपुरी पडू लागल्यानंतर वाड्यांची जागा उंच इमारतींनी घेतली. परंतू 300 वर्षे जुना असलेल्या पनवेल शहरातील बापटवाड्याची पडझड होवूनही इतिहासाची साक्ष देत उभा होता. सध्या या वाड्यात 12 भाडेकरु वास्तव्यास होते. वाडा धोकादायक झाल्याने पालिकेने दीड महिन्यापूर्वी भाडेकरूंना नोटिसा बजावल्या होत्या. घरे तात्काळ खाली करण्याच्या सुचना पालिकेकडून करण्यात आल्या होत्या. यानंतर या वाड्यावर तोडक कारवाई करण्यात आली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami