संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

पत्रकार राणा अय्यूबची याचिका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली :- केटो नावाच्या ऑनलाईन क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेकायदा निधी जमवून त्याचा वैयक्तिक कारणांसाठी वापर केल्याचा गंभीर आरोप राणा अय्यूब हिच्याविरोधात आहे. केटो प्लॅटफॉर्मवर निधी जमवून अय्यूब हिने मोठी रक्कम तिचे वडील आणि बहिणीच्या नावावर वर्ग केली होती. याशिवाय स्वतःसाठी तिने ५० लाख रुपयांची एफडी बनविली होती. तर चॅरिटीच्या माध्यमातून २९ लाख रुपये खर्च केले होते. सदर प्रकरणी गाझियाबादच्या विशेष न्यायालयाने २७ जानेवारीरोजी राणा अय्यूबला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र तिने या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने सदरची याचिका फेटाळून लावली आहे.

गाझियाबादच्या विशेष न्यायालयाने पत्रकार राणा अय्यूबला २७ जानेवारीला हजर राहण्याचे समन्स पाठवला होता. याविरोधात राणा अय्युबने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी समन्सला स्थगिती दिली होती. मात्र आता तिची न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

आजचे हवामान
ताज्या बातम्या