संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

पती-पत्नीच्या घरगुती भांडणात स्वत:च्या मुलीला गोळी लागली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे : पती-पत्नीच्या घरगुती भांडणात स्वतःच्या आठ वर्षाच्या मुलीला गोळी लागण्याची धक्कादायक घटना पुण्यातील नऱ्हे परिसरात घडली आहे. मुलगी राजनंदिणी ही या गोळीबारात गंभीर जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पांडुरंग तुकाराम उभे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग उभे हे कुटुंबासह नऱ्हे येथील जेएसपीएम कॉलेज जवळ असणाऱ्या परिसरात राहतात. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तसेच त्यांच्याकडे परवाना असलेले रिवाल्वर आहे. शुक्रवारी रात्री दारू पिऊन घरी आले. त्यामुळे दोघा नवरा – बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात त्यांनी बायकोवर रिवाल्वर उगारली मात्र ती गोळी त्यांच्या आठ वर्षीय मुलीला छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पांडुरंग उभे यांना ताब्यात घेतले. त्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सिंहगड रस्ता पोलिसांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami