पणजी- गोव्यातील राजधानी शहर असलेल्या पणजीमध्ये समुद्राच्या फेरी धक्क्यावर असलेली दुकाने हटवून त्याजागी कॅसिनो व्यवसायाला चालना देण्याचा पर्यटन खात्याकडून सुरू आहे.त्यासंदर्भात निविदा प्रक्रिया ही काही सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर राबवली जाणार आहे.फेरी धक्क्यावरील ही जागा आता रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलिटीसाठी दिली जाणार असल्याचे समजते.
या फेरी धक्क्यावर असलेले मांडवी हॉटेल आणि पर्यटन विभाग यांच्यात सध्या उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर कायदेशीर लढाई सुरू आहे.या संदर्भातील अंतिम सुनावणी सोमवार १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.या सुनावणीचा निकाल पर्यटन खात्याच्या बाजूने लागला की लगेच रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलिटी संदर्भातील प्रकल्प आणण्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सूत्रांकडून कळते.आधीच्या सुनावणीवेळी ही जागा पर्यटन खाते ताब्यात घेऊ शकते,असा आदेश उप जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.मात्र मांडवी हॉटेलने त्यासाठी१५ दिवसांची मुदत मागितली होती.मात्र आता ही मुदत २५ ऑगस्ट रोजीच संपल्याने ही जागा पर्यटन खात्याने ताब्यात घेऊन सीलबंद केली आणि निविदा जारी केली.पण मांडवी हॉटेलने त्याबाबत कप्तान आणि बंदर खात्याकडे तक्रार केली आहे.आता त्यावर पर्यटन खात्यासाठी सकारात्मक सुनावणी झाली की लगेच पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू होऊ शकते असे असे सूत्रांचे म्हणणे आहे.