संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

पगारासाठी नाशिकच्या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – तीन महिन्यांपासून पगार मिळत नसल्यामुळे मेटाकुटीला आलेल्या नाशिकच्या सिटी लिंक सेवा बस कर्मचाऱ्यांनी आज सकाळी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे बससेवा ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसाई होऊन तारांबळ उडाली. काही तास सुरू असलेल्या या आंदोलनानंतर शनिवारपर्यंत पगार देण्याचे प्रशासनाने कबूल केले. तेव्हा कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आणि शहरातील बससेवा पुन्हा सुरू झाली.
नाशिक महापालिकेच्या परिवहन मंडळाने २ वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत खासगी तत्त्वावर सिटी लिंक शहर बस सेवा सुरू केली. कंत्राटदार ही बससेवा चालवतात. त्यासाठी कंत्राटदाराने कंत्राटी पद्धतीने वाहक आणि चालकांची भरती केली आहे. मात्र त्यांना वेळेवर पगार दिला जात नाही. कर्मचाऱ्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाते. वेळेवर पगार द्यावा आणि चुकीच्या पद्धतीने होणारी कारवाई थांबवावी यासाठी त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु त्यानंतरही त्यात काहीच सुधारणा झाली नाही. ३ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी आज सकाळी अचानक कामबंद आंदोलन केले. त्यात सुमारे ५०० कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे नाशिकची बससेवा ठप्प होऊन नागरिकांची मोठी गैरसोय झाली. त्यानंतर प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर कंत्राटदाराने शनिवारपर्यंत पगार देण्याचे कबूल केले. तेव्हा कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले व बस सेवा सुरू झाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami