संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

”पंतप्रधान मोदी हे देवाचा अवतार “उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांचे वक्तव्य !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनऊ – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार असून ते हवं तेव्हा लोकांकडून त्यांना जे हवं ते ते करवून घेतात.ते देवाचाच अवतार असल्याने त्यांची इच्छा आहे तोपर्यंत मोदी पंतप्रधानपदी राहू शकतात असे वक्तव्य उत्तर प्रदेशच्या राज्यमंत्री गुलाब देवी यांनी केले आहे.

गुलाब देवी या सांभल जिल्ह्यातील चांदौसी या मतदारसंघातील भाजपच्या आमदार आहेत.त्यांनी एका ठिकाणी बोलताना मोदींचे तोंडभरून कौतुक करत त्यांना देवाचा अवतार बनवले असून त्यांचे हे वक्तव्य सध्या खूप चर्चेचा विषय बनले आहे.दरम्यान, यावेळी देवी यांना देशात अल्पसंख्याक व्यक्तीला पंतप्रधान करण्याबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या,ही लोकशाही आहे, इथे कोणी काहीही वक्तव्य करू शकतो, त्यासाठी कोणाचेही बंधन नाही, शिवाय आम्ही या वक्तव्यांना फारसे महत्त्व देत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अवताराच्या रूपात असून ते विलक्षण प्रतिभा असलेले व्यक्ती आहेत, त्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. शिवाय जोपर्यंत मोदींची इच्छा आहे जोपर्यंत त्यांचे आयुष्य आहे तोपर्यंत ते पंतप्रधान राहतील असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami