संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचा आजपासून कर्नाटक दौरा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेेंद्र मोदी हे उद्या सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस कर्नाटकच्या दौर्‍यावर जाणार आहेत. उद्या सोमवारी त्यांच्या हस्ते राजधानी बंगळुरु तसेच म्हैसूरमधील 27 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या रेल्वे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये सेेंंटर फॉर ब्रेन रिसर्चची स्थापना करण्यात आलेली आहे. या केेंद्राबरोबरच बागची-पार्थसारथी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ इकोनॉमिक्सच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या ठिकाणी असलेल्या आंबेडकरांच्या नवीन पुतळ्याचे अनावरणही त्यांच्या हस्ते होणार आहे. कर्नाटक आयटीच्या माध्यमातून 150 टेक्नॉलॉजी हबची सुरुवात करण्यात आलेली आहे. याचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर कोम्माघाटा येथे 27 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या रेल्वे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. त्यानंतर म्हैसूर येथील महाराजा मैदानावर मोदी यांची सार्वजनिक सभा पार पडणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami