संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

पंतप्रधान नरेेंद्र मोदींच्या भावाचा संसदेला घेराव घालण्याचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात पंतप्रधान नरेेंद्र मोदींनी माघार घेतली. पण आता पुन्हा एकदा देशातील एका मोठ्या संघटनेने संसदेला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे हा इशारा पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी दिला आहे. ऑल इंडिया रेशन वितरक संघटना गेल्या काही वर्षापासून त्यांच्या मागण्यांसाठी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे निवेदन देत आहेत. मात्र, या निवेदनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने रेशन वितरक देशव्यापी आंदोलन करणार आहेत, अशी माहिती प्रल्हाद मोदी यांनी दिली. त्यानुसार 4 जुलै रोजी तालुका स्तरावर आंदोलन, 11 जुलैला जिल्हा स्तरावर, 18 जुलैला राज्यांच्या राजधानीत आंदोलन आणि 2 ऑगस्ट रोजी राजधानी दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलन होणार असल्याचे प्रल्हाद मोदी यांनी सांगितले.

धान्य वितरकांचे कमिशन वाढवावे, रेशन वितरकांना एलपीजी गॅस आणि खाद्यतेल वितरण करण्याची परवानगी द्यावी, पश्चिम बंगाल रेशन मॉडेल देशभर राबवावे, तांदूळ, गहू, साखर विक्रीवर योग्य कमिशन द्यावे, वितरक लोकांनी कोरोना काळात काम केले त्यांच्या कार्याची दखल घ्यावी यांसह आदी मागण्यांसाठी ऑल इंडिया रेशन वितरक संघटना गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारकडे पत्राद्वारे निवेदन देत आहे. मात्र, या निवेदनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने रेशन वितरक देशव्यापी आंदोलन छेडणार आहेत, अशी माहिती प्रल्हाद मोदी यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. प्रल्हाद मोदी हे रेशन वितरक आहेत. केंद्र सरकारने मागण्या मान्य न केल्यास संसदेला घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. एवढेच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारने रावबलेले रेशनिंगचे मॉडेल देशभरात राबवावे अशी मागणीही ऑल इंडिया रेशन वितरक संघटनेने केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami