संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पंतप्रधानांच्या गुजरात दौर्‍यापूर्वी कॉँग्रेस आमदाराला बेदम मारहाण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदाबाद- आगामी गुजरात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेेंद्र मोदी हे आजपासून तीन दिवसीय गुजरात दौर्‍यावर आहेत. असे असताना काल रात्री कॉग्रेस आमदार अनंत पटेल यांच्यावर काही जणांनी हल्ला करुन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. भाजपाच्या जिल्हा पंचायत अध्यक्षाने हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या आमदार समर्थकांनी दुकानांना आग लावली. तसेच अग्‍निशमन दलाच्या गाड्यांचीही तोडफोड केली. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौर्‍याआधीच गुजरातमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
काल रात्री नवसारी जिल्ह्यातील खेरगाममध्ये कॉँग्रेस आमदार आणि आदिवासी नेते अनंत पटेल यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला मार लागला. याची माहिती वार्‍यासारखी पसरताच पटेल समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. संतप्त कार्यकत्यार्र्ंनी यावेळी एका दुकानाला आग लावत अग्निशमन दलाच्या गाड्यांचीही तोडफोड केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. अनंत पटेल यांच्यावर जिल्हा पंचायतच्या अध्यक्षाने हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. हल्ल्यानंतर पटेल हे धरणे आंदोलनाला बसले होते. जोपयर्र्ंत त्या जिल्हा पंचायत अध्यक्षाला आणि त्याच्या गुंडांना अटक होत नाही तोवर आम्ही आंदोलन करत राहणार, असे पटेल म्हणाले. भाजपा सरकारविरोधात जो आवाज उठवितो त्याला मारले जाते, तुरुंगात पाठविले जाते, असा आरोपही पटेल यांनी यावेळी केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami