कोल्हापूर- पंढरपूरच्या वाखरी गावातील मारुती सुरवसे या २३ वर्षाच्या पहिलवानाचा कोल्हापूरच्या तालमीत कुस्तीचा सराव करताना रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. कुस्तीचा सराव केल्यानंतर अंघोळ करताना मारुतीला हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
पंढरपूरच्या वाखरी गावातील शेतकरी कुटुंबातील मारुती सुरवसेला लहानपणापासून कुस्तीची आवड होती. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्याने कोल्हापूरच्या तालमीत सराव सुरू केला होता. पहिलवानांची पंढरी असलेल्या कोल्हापूरच्या तालमीत तो सराव करत होता. रात्री सराव केल्यानंतर आंघोळ करताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.