संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

पंढरपुरात 30 जूनपासूनसर्व वाहनांना प्रवेशबंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलापूर – आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर तीर्थक्षेत्र पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्ग 30 जून ते 13 जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनास बंद करण्यात येणार आहेत. महाद्वार चौक ते शिवाजी चौक सावरकर चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहिल, असे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले. वाहतूक अडथळा होऊ नये, म्हणून सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले की, आषाढी वारीसाठी विविध जिल्हे, तसेच अन्य राज्ये येथून लाखो भाविक पंढरपूर येथे येतात. चालतांना वारकर्‍यांचा पाय खड्ड्यात पडून काही दुर्घटना होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेने प्रयत्न करावेत. शहरातील नगर प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार घाट ते घाट चौक, नामदेव पायरी यांसह शहरातील रस्त्यांवर असणारे खड्डे बुजवण्याचे निर्देश शंभरकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami