संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

पंढरपुरातील श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या बैठकीत राडा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पंढरपूर -पंठरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा करण्यासाठी सत्ताधारी चेअरमन भगीरथ भालके गटाने आज बैठक बोलावली होती. या बैठकीत ऊसाचे बिल मागितलेल्या शेतकर्‍याला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी धक्‍कबुक्‍की केल्याने काही काळ गोंधळ उडाला.

पंढरपुरातील मंगल कार्यालयात श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे आणि विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद यांची निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय बैठक आयोजित केली होती. यावेळी रोपळे येथील शेतकरी जगन भोसले यांनी माईकवर येत आपण अनेक वेळा चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्याकडे ऊसाचे बिल द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र अद्यापपर्यंत मला ऊसाचे बिल मिळाले नाही, असे सांगितले. अनेक भाषणं केली पण कोणीही काही केलेल नाही, अशी व्यथा मांडली. यावेळी संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जगन भोसलेला धक्काबुक्की केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami