संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

पंजाब सरकारने पुन्हा 424 व्हीआयपींना सुरक्षा पुरवली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंदीगड- पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर आणि पंजाबमध्ये न्यायालयाने फटकारल्यानंतर पंजाब सरकारने पुन्हा 424 व्हीआयपींची सुरक्षा पुरवली आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने या व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली होती. यामध्ये सिद्धू मुसेवाला यांचाही सहभाग होता. पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने यादी लीक झाल्याबद्दल पंजाब सरकारला फटकारले होते.

व्हीआयपींची सुरक्षा मर्यादित कालावधीसाठीच काढण्यात आली आहे, असे पंजाब सरकारने सांगितले होते. त्याचवेळी सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर त्यांच्या वडिलांनीही मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहून सुरक्षा हटवण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कोणाची सुरक्षा हटवायची असेल तर त्याचा योग्य तो आढावा घ्यावा, तरच तसा निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने पंजाब सरकारला सांगितले होते. पंजाब सरकारने 424 व्हीआयपींची सुरक्षा हटवली होती. यामध्ये शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ नेते चरण जीत सिंह ढिल्लो, सतगुरू उदय सिंह, संत तरमिंदर सिंग यांचाही समावेश होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami