संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

पंजाब आणि सिंध बँकेवर मोठी कारवाई! आरबीआयने ठोठावला २७.५ लाखांचा दंड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पंजाब आणि सिंध बँकेवर आरबीआयने कारवाई केली. या बँकेला २७.५ लाखांचा दंड ठोठावला. त्यापूर्वी आरबीआयने बँकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. तिला बँकेने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे आरबीआयने ही कारवाई केली.

भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग क्षेत्रासाठी नियम आणि कायदे केले आहेत. त्यानुसार व्यवहार करणे बँकांना बंधनकारक आहे. असे असताना कर्ज देताना त्या संबंधीच्या नियमांचे पंजाब आणि सिंध बँकेने काटेकोर पालन केले नाही. रिझर्व्ह बँकेच्या तपासणी हा प्रकार उघड झाला. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि सिंध बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तिला बँकेने दिलेले उत्तर समाधानकारक नव्हते. म्हणून या बँकेवर ४७ लाख ५० हजारांच्या दंडाची कारवाई केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami