संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

पंजाबमध्ये ३०० नाही, ६०० युनिट वीज मोफत मिळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनौ – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकतेच सर्वसामान्य जनतेला दरमहा ३०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता पंजाब सरकारने मोफत विजेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक घरात ३०० युनिट मोफत वीज देण्याच्या निर्णयाला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करून दिली आहे.

पंजाबमध्ये एकहाती सत्ता स्थापन करणाऱ्या आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वी येथील नागरिकांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ३०० युनिट्स वीज मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार होते. मात्र आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्यक्षात दरमहा ३०० ऐवजी ६०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये पंजाबच्या जनतेला दिलेल्या मोफत विजेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार पंजाबमधील नागरिकांना प्रत्येक महिन्याला ६०० युनिट मोफत वीज मिळणार आहे. या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेला दरमहा २०० युनिट मोफत वीज देते. आता पंजाबमध्येही मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपच्या या मोफत वीज घोषणेची सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे लोकांना मोफत वीज पुरवणारे पंजाब हे दिल्लीनंतर दुसरे राज्य बनले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami