संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

पंजाबमध्ये मोठ्या घातपाताचा कट! रेल्वेचे रूळ उखडण्याचा डाव उधळला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंदिगड- रेल्वेचा अपघात घडवून मोठा घातपात करण्याचा कट सुरक्षा यंत्रणा आणि रेल्वे पोलिसांनी उधळला. पंजाबमध्ये रेल्वे रूळ उखडण्याचा कट त्यामुळे फसला. पटियाळा वीज केंद्राला कोळसा पुरवठा करणार्‍या रेल्वे लाईनच्या १,२०० क्लिप एका रात्रीत गायब करून हा घातपात घडवण्याचा कट होता. तो निष्फळ ठरल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
पटियाळातील वीज प्रकल्पाला कोळशाचा पुरवठा करणाऱ्या रेल्वे मार्गावरील रुळाच्या १,२०० क्लिप अज्ञतांनी एका रात्रीत गायब केल्या. त्यामुळे कोळसा पुरवणारी मालगाडी घसरून अपघाताची शक्यता होती. हा रेल्वे अपघात झाला असता तर वीज केंद्राला कोळशाचा पुरवठा झाला नसता आणि तो बंद पडला असता. हा कट रेल्वे पोलिस आणि सुरक्षा दलाने उधळला. या घटनेमागे कोण आहे याचा तपास सुरक्षा दलाचे जवान करत आहेत. पंजाबला वीज पुरवठा करणाऱ्या वीज प्रकल्पाला रेल्वेने कोळसा पुरवठा होऊ नये या हेतूने रेल्वेमार्गाच्या क्लिप काढून टाकल्या होत्या. आज सकाळी वीज केंद्राला कोळसा पुरवणाऱ्या २ मालगाड्या तेथून जाणार होत्या. मात्र सुदैवाने हा अपघात टळला. येथे घातपात घडवण्याचा झालेला हा दुसरा प्रयत्न आहे. यापूर्वी मेच्या पहिल्या आठवड्यात ६० क्लिप काढल्या होत्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami