संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

पंजाबचे माजी मुख्यमंत्री
कॅप्टन अमरिंदर सिंह भाजपात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आज त्यांच्या कार्यकत्यार्र्ंसह भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांनी त्यांचा पंजाब लोक कॉँग्रेस हा पक्षदेखील भाजपात विलीन केला. केेंद्रीय मंत्री नरेेंद्र सिंह तोमर आणि किरेन रिजीजू यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली असल्याचे सांगितले. यामध्ये पंजाबचे भविष्य पाहायचे असेल तर भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असेही ते म्हणाले. आमची आणि भाजपची विचारधारा एकच असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी बोलताना केेंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की, पंजाब लोक कॉँग्रेसचे भाजपमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे पक्ष मजबूत होईल. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नेहमीच सर्वात आधी प्राधान्य दिले आहे. भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. अमरिंदर सिंह यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नेते आणि पंजाब विधानसभेचे माजी उपसभापती अजयब सिंग भाटी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप हा असा पक्ष आहे, ज्यामध्ये नेहमीच अभिमानाने देश प्रथम आणि पक्ष दुसरा असल्याचे सांगितले जाते. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या आयुष्यात हे तत्व नेहमीच अंगीकारले. त्याचाच परिणाम म्हणून आज आम्ही सगळे एकत्र आहोत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami