वेलिंग्टन : तंबाखूमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी अनेक देश विविध मोहिम राबवत आहेत. 1 जानेवारी 2009 किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या व्यक्तींसाठी न्यझीलंड सरकारने तंबाखूजन्य पदार्थ खरेदी विक्री करण्यावर निर्बंध लादले आहेत.२०२५ पर्यंत देशाला धुम्रपान मुक्त करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे देशाच्या सह आरोग्यमंत्री डॉ.आयेशा वेरल यांनी सांगितले आहे.
2008 नंतर जन्म झालेल्या व्यक्तींना ध्रुमपान करण्यास बंदी घालण्याचा विचार न्यूझीलंड सरकारने घेतला आहे. पुढील काही वर्षात देशाला तंबाखूमुक्त करण्याचे नियोजन सरकार करत आहे. न्यूझीलंडमध्ये दरवर्षी ५० लाख लोकसंख्येपैकी पाच लाख लोक धुम्रपान करतात. दरवर्षी ४५०० जणांचा मृत्यू होतो. देशाच्या सह आरोग्यमंत्री डॉ. आयेशा वेरल यांनी सांगितले की, धुम्रापन मुक्त पिढी तयार करण्यासाठी वर्ष २०२२ मध्ये १८ वर्षांहून कमी वयाच्या तरुणांना तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस मनाई करण्यात आली आहे. सध्या असलेली परिस्थिती आणि नियमांचे पालन केल्यास नक्कीच लक्ष्य गाठता येणार आहे. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करताना तुमचे वय साधारण 63 वर्षे असल्याचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. फक्त वयस्कारांसाठी सिगरेट खरेदी विक्री लागू आहे.तसेच तंबाखूमध्ये निकोटीनचे प्रमाण कमी केले जाणार आहे.
मात्र , दुसरीकडे सरकारच्या या प्रस्तावित कायद्याला विरोध करण्यात येत आहे. एसीटी पक्षाने म्हटले की, निकोटीन कमी केल्याने सिगारेटच्या विक्रीत वाढ होईल. त्याशिवाय काळाबाजारही होण्याची शक्यता आहे. किरकोळ दुकानदारांना याचे नुकसान सहन करावे लागू शकते.