ख्रईस्टचर्च -न्यूझीलंड मध्ये सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत बांगलादेशचा आणखी एक पराभव झाला. बांगला देशाचा हा सलग दुसरा पराभव आहे. पाकिस्तान पाठोपाठ यजमान न्यूझीलंडनेही बांगला देशाचा ८ गाडी राखून पराभव केला आहे.
बांगला देशाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १३७ धाव केल्या आणि न्यूझीलंड समोर विजयासाठी १३८ धावांचे आव्हान ठेवले होते. नजमूल हुसेन याने ३३ तर नुरुळ हसन याने २५ धाव केल्या या दोघांच्या व्यतिरीक्त बांगला देशाचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजानी बांग्लादेश च्या फलंदाजांना पाळता भुई थोडी करून टाकली . त्यानंतर अवघ्या २ गाड्यांच्या मोबदल्यात १८ षटकातच टार्गेट गाठून बांग्लादेशला पराभूत केले. न्यूझीलंडच्या कॉन्वेने ५१चेंडूत नाबाद ७० धावा केल्या. तर कर्णधार केन विलियम्सन याने ३० धाव केल्या . बांगला देशाच्या गोलंदाजांना न्यूझीलंडचे केवळ २ विकेट्स घेता आल्या शारीफुल इस्लाम आणि हसन मेहमूद यांनी प्रत्येकी १ बळी घेतला .