नवी दिल्ली- यंदा नोव्हेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. या महिन्यात दरवर्षी देशात सरासरी २९.७ मिमी पावसाची नोंद होते. ईशान्य मौसमी वाऱ्यामुळे दक्षिण भारतात नोव्हेंबरमध्ये सरासरी ११८.९ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा देशात सरासरीपेक्षा १२३ टक्के जास्त पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली.
नोव्हेंबरमध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. त्यामुळे देशाच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहणार असल्याने नोव्हेंबरमध्ये थंडीचा कडाका कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. परतीच्या पावसाने २५ ऑक्टोबरपर्यंत थैमान घातले. ईशान्य मौसमी वाऱ्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त होते. सर्वसाधारणपणे नोव्हेंबरमध्ये देशात २९.७ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा मात्र सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतात नोव्हेंबरमध्ये ११८.९ मिलिमीटर पावसाची नोंद होते. ईशान्य मौसमी वाऱ्यामुळे पावसाचे प्रमाण जास्त असते. मात्र यंदा देशात सरासरीपेक्षा १२३ टक्के जास्त पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी तर उर्वरित देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे, असे मोहापात्रा यांनी सांगितले. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. वायव्य भारत आणि हिमालय पर्वत पायथ्याशी किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील. परतीचा पाऊस गेल्यानंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. परंतु नोव्हेंबरमध्ये राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.