संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

नोकरीचे आमिष दाखवल्याप्रकरणी सैराट फेम प्रिन्सला अटक होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवत पाच लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात ‘सैराट’ या चित्रपटात प्रिन्सची भूमिका साकारलेला अभिनेता सुरज पवार याचाही समावेश असून त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगार तरुणाला फसवणाऱ्या भामट्यांना राहुरी पोलिसांनी गजाआड केले आहे. यामध्ये मोठे रॅकेट असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील महेश बाळकृष्ण वाघडकर यांना ३ सप्टेंबर रोजी एक फोन आला . समोरची व्यक्ती म्हणाला की, मी श्रीरंग कुलकर्णी सामाजिक न्याय विभाग मंत्रालयातून बोलत आहे. आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या सहायक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत. तेथे तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापुर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर तयार होईल. तेव्हा तीन लाख रुपये द्या. त्यामुळे, रोजगाराचा प्रश्न असल्याने वाघडकर यांनी पैसे देण्यास सहमती दर्शविली. तर, ठरल्याप्रमाणे ४ सप्टेंबर २०२२ रोजी राहुरी बस स्थानकावर दोघांमध्ये तोंडी करार झाला आणि पहिल्या टप्प्यात त्याने आरोपीस दोन लाख रुपये दिले. तर उरलेली रक्कम ३ लाख रुपये ही नियुक्तीपत्र आल्यानंतर देण्याचे ठरले होते.९ सप्टेंबर रोजी आरोपी तथा तोतया श्रीरंग कुलकर्णी याने विद्यापीठ येथे येणार असल्याचे सांगितल्याने फिर्यादी वाघडकर हे देखील तेथे पैसै घेऊन गेले. आरोपीच्या काही गोष्टींचा वाघडकर यांना संशय आल्याने त्यांनी पुढील रक्कम न देता आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपी दत्तात्रय क्षिरसागर (रा. नाशिक), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे ( रा. संगमनेर ) या तिघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय यात सैराट या गाजलेल्या चित्रपटातील एक पात्र प्रिन्स म्हणजेच सूरज पवारच्या मुसक्या आवळणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami