संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

नेवासा तालुक्यातील शहीद जवान बंडू नवथर यांना अखेरचा निरोप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदनगर- गडचिरोली येथे तैनात असलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानाने अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली होती. यातील
शहीद जवान बंडु बंशी नवथर (३२) यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी सकाळी नेवासा तालुक्यातील पिंप्रीशहाली या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नेवासा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विजय करे व त्यांचे टीमने रायफल मधून हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली.

या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. शोकाकुल वातावरणात ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी शहीद जवानाला अखेरची सलामी दिली. शहीद बंडू नवथर यांच्या पश्चात त्यांच्या परिवारामध्ये वृद्ध आई- वडील, पत्नी व एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शहीद बंडु नवथर आणि त्यांचे सहकारी श्रीकांत बेरड
यांच्यामध्ये अंतर्गत वादातून भांडण झाले होते. रागाच्या भरात रायफलमधून श्रीकांत याने बंडूवर गोळी झाडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यानंतर श्रीकांत यांनी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. दोघेही दौंड पुणे येथील एसआरपीएफ कॅम्पचे जवान होते.अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्य़ातील मरपल्ली पोलीस ठाण्याच्या बरॅकमध्ये ही घटना घडली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami