संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

नेपाळच्या नोटाही आता नाशिकमध्ये छापणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक : नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेसला नेपाळच्या एक हजाराच्या ४३० दशलक्ष, तर ५०च्या ३०० दशलक्ष अशा ७३० दशलक्ष नोटा छपाईचे कंत्राट मिळाले आहे. याबाबतचा नुकताच नेपाळबरोबर करार करण्यात आला आहे. विशषेतः छपाईचे कंत्राट मिळवण्यासाठी चीन स्पर्धेत असतानाही भारतातील प्रेसने हे काम मिळविल्याने या कंत्राटाचे महत्व अधिक वाढले आहे.

यापूर्वी ५० रुपयाच्या ३०० दशलक्ष नोटा छापण्याचे वेगळे कंत्राटही मिळाले आहे. त्यामुळे एकूण ७३० दशलक्ष नोटा छापण्याचा करार नेपाळबरोबर नुकताच झाल्याची मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी सांगितले. नेपाळच्या नोटांबरोबरच भारताच्या एकूण ५३०० दशलक्ष नोटा छापण्याचे मोठे कामही प्रेसला मिळाल्याने या सर्व नोटा एक वर्षात छापून द्यायच्या असून कामगार त्यासाठी सज्ज झाले आहेत.

प्रेस आणि प्रेस कामगारांचे अस्तित्व अबाधित रहावे, यासाठी वेळोवेळी योग्य व आवश्यक भूमिका प्रेस मजदूर संघ घेत आहे. तसेच रिझर्व्ह बॅँकेनेही स्वतःचा नोटाचा कारखाना सुरू केला आहे. त्यामुळे प्रेस आणि कामगारांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी इतर देशांच्या नोटा छापण्याचे कंत्राट मिळावेत यासाठी प्रेसने व्यवसायाच्या वेगळ्या वाटा शोधण्यास सुरुवात केली असताना नेपाळच्या नोटा छपाईच्या कंत्राटामुळे त्याला यश आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या