संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 28 January 2023

नेपाळची बस सावंतवाडीच्या रस्त्यावरुन शेतात कोसळली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सावंतवाडी – गोव्यातून नेपाळकडे पर्यटकांना घेऊन चाललेली बस कोकणातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा ते आंबोली जाणाऱ्या रस्त्यावरुन शेतात बावळट येथे कलंडली.या अपघातात तीन पर्यटकांना किरकोळ जखमी झाली असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.दरम्यान, अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
नेपाळच्या पर्यटकांना घेऊन चाललेली ही बस उतारावर ब्रेक निकामी झाल्यामुळे रिव्हर्स घेताना थेट लगतच्या बावळट रस्त्यावर शेतात कोसळली.बांदा दाणोली जिल्हा मार्गावर बावळट – मुलांडावाडी येथे गुरुवारी रात्री १० च्या सुमारास झालेल्या या अपघातात तीन पर्यटक जखमी झाले.हे पर्यटक बसने गोवा येथून नेपाळकडे परतत असताना हा अपघात घडला.या अपघातात निशा खडका (२२) आणि साधना सोनी (३२) जखमी झाले असुन या पर्यटकांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश होता.या घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजित घाडी, हेड पोलीस कॉन्स्टेबल मयूर सावंत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थ व अन्य वाहनचालकांच्या मदतीने प्रवाशांना बसमधून बाहेर काढत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami