संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

नुपूर शर्माचे समर्थन प्राणावर बेतले
टेलरची गळा चिरून निर्घृण हत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

प उदयपूर

राजस्थानात मंदिरावर केलेल्या कारवाईवरून झालेला वाद अजूनही मिटलेला नाही तोच नुपूर शर्माचे समर्थन करणार्‍या एका मुलाच्या बापाची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर उदयपूरमध्ये हिदुत्त्ववादी संघटना रस्त्यावर उतरली असून प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. उदयपूरच्या माल्दा स्ट्रीटवर राहणार्‍या कन्हैय्यालाल यांच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ एक पोस्ट टाकली होती. त्यामुळे दोन हल्लेखोरांनी कन्हैय्यालाल यांच्या दुकानात शिरून त्यांची गळा चिरून हत्या केली. या घटनेची माहिती उदयपूरमध्ये पसरताच हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आणि तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढविण्यात आला. आरपीएफच्या 30 आणि आरएसीच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्यात. इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami