संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

नीरा डावा अस्तरीकरणाविरुद्ध निमगावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बारामती :सध्या निरा डावा कालव्याच्या क्रॉंक्ट्रीकरणाच्या अस्तरीकरणाचे काम सिमेंट काँक्रीटद्वारे वडकुते खुर्द परिसरात सुरु झालेले आहे. त्या कामास बहुसंख्य शेतकऱ्यांचा विरोध आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी निमगाव केतकीत रास्ता रोको आंदाेलन केले. यामुळं इंदापूर – बारामती राज्य महामार्गावरील वाहतुक सुमारे अर्धा तास खाेळंबली हाेती. या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनधारकांना याचा त्रास हान करावा लागला. आंदाेलन मागे घेतल्यानंतर महामार्गावरील वाहतुक सुरळीत झाली असल्याचे समजते आहे.

नीरा डावा कालवा क्रॉंक्ट्रीकरणाच्या अस्तरीकरणाच्या आदेशाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवण्यासाठी गुरुवारी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे इंदापूर- बारामती राज्य महामार्ग सुमारे अर्धा तासाहुन अधिक काळ रोखुन धरत निषेध व्यक्त केला. यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या कालवा अस्तीकरणासाठी केलेल्या रास्ता रोकोला पाठिंबा दिला. अस्तरीकरणामुळे फक्त शेतकऱ्यांचाच तोटा होणार नाही तर कालव्याच्या परिसरातील जैवविविधता देखील धोक्यात येणार आहे. पर्यावरणाची फार मोठी हानी होणार आहे. त्यामुळे शासनाने त्यांचा निर्णय रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे काम बंद केले नाही तर मोठे आंदोलन छेडू असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami