संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

नीट-पीजी परीक्षा वेळेतच
याचिका कोर्टाने फेटाळली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा अर्थात नीट-पीजी 2023 परीक्षा पुढे ढकलण्यासाठी दाखल केलेली याचिका आज सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने फेटाळली. त्यामुळे परीक्षा नियोजित वेळेतच होईल. 5 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यास करण्यास पुरेसा वेळ न मिळाल्याने परीक्षा पुढे ढकलवी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.
सुप्रीम कोर्टात आजच्या सुनावणीत केंद्र सरकारच्या वकील ऐश्वर्या भाटी यांनी सांगितले की, ‘या परिक्षेची तारीख 6 महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या विंडोदरम्यान 2.03 लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र जारी केले गेले आहे. दुसऱ्या विंडोदरम्यान केवळ 6 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे फार कमी विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे ही परिक्षा पुढे ढकलू नये, अशी आमची विनंती आहे. नीट-2022 समुपदेशन आणि प्रवेशांमध्ये कोरोनामुळे झालेल्या विलंबाचा वैद्यकीय इच्छुकांच्या परीक्षेच्या तयारीवर मोठा परिणाम झाला असल्याची चिंता विद्यार्थी आणि वैद्यकीय संघटनांनी व्यक्त केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या