संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

नियम मोडल्यामुळे लालबागचा राजा मंडळाला पालिकेचा ३.६६ लाखांचा दंड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा मंडळाने पालिकेचे नियम मोडले. त्यामुळे मंडळाला ३ लाख ६६ हजारांचा दंड पालिकेने ठोठावला आहे. पालिकेच्या ‘ई’ वार्ड कार्यालयाने मंडळाला दंडाच्या कारवाईची नोटीस पाठवली आहे. १८३ बेकायदा खड्डे पाडल्यामुळे पालिकेने मंडळावर ही कारवाई केली.
मुंबईतील गणेशोत्सवात लालबागचा राजा हे प्रमुख गणेशोत्सव मंडळ आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविक येतात. कोरोनाच्या निर्बंधानंतर २ वर्षांनी यंदाचा गणेशोत्सव मोकळ्या वातावरणात साजरा झाला. मात्र त्यात गणेशोत्सव मंडळाने पालिकेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. रस्ता व पदपथावर १८३ बेकायदा खड्डे पडले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या ई प्रभाग कार्यालयाने लालबागचा राजा मंडळाला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी ३ लाख ६६ हजारांच्या दंडाची कारवाई केली आहे. तशी नोटीस मंडळाला पाठवली आहे. पदपथावर ५३ आणि रस्त्यांवर १५० असे १८३ बेकायदा खड्डे मंडळाने पडले. पालिकेच्या नियमानुसार एका खड्ड्यासाठी २ हजार रुपयेप्रमाणे ३ लाख ६६ हजारांचा दंड पालिकेने मंडळाला ठोठावला आहे. त्याची नोटीस मंडळाला दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami