संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

निम्म्या कोल्हापूर शहराचा सोमवारी पाणीपुरवठा बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर- वीज पारेषण कंपनीच्या कामासाठी शिंगणापूर जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे. याकाळात निम्म्या कोल्हापूर शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहरातील पुईखडी, कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून ए, बी, व ई वॉर्ड, संलग्न उपनगरे अशा निम्म्याहून अधिक शहरात, तसेच ग्रामीण भागात सोमवारी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. मंगळवारचा पुरवठाही अपुरा व कमी दाबाने होईल असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ए, बी वॉर्ड, संलग्न भागांतील फुलेवाडी रिंगरोड, साने गुरुजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, साळोखेनगर टाकीवरील भाग, जरगनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी इत्यादी ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami