संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

निफाडच्या पालखी परिसरात अचानक ढगफुटी सदृश पाऊस! शेतीचे नुकसान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

निफाड- तालुक्यातील – पालखेड परिसरात काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे एक तास पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या, याचा परिणाम मका, सोयाबीन, टोमॅटो या पिकांवर तसेच नुकतेच सुरू असलेल्या द्राक्ष बाग छाटणीवर होणार आहे. द्राक्ष हंगाम सुरू झाल्याने छाटण्यांची कामेही सुरू झाली असून, छाटणी केलेल्या काही द्राक्षउत्पादकांच्या द्राक्ष बागेला नवीन फुटवा येत असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या आसमानी संकटाने टोमॅटो, मका, सोयाबीन यांसारख्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यावर देखील मोठ्या प्रमाणत परिणाम होत आहे.या जोरदार पावसामुळे सर्व शेतकऱ्यांच्या मनावर काळजीचे सावट निर्माण झाले आहे. ढगफुटीसदृश्य पावसाने पालखेड परीसरातील काही रस्त्यातील वाहतुक ठप्प झाली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami