संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

‘नासा’ च्या चांद्र मोहिमेला धक्का!
दुसर्‍यांदा रॉकेटमध्ये इंधन गळती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

केप केनेडी – सार्‍या जगाच्या नजरा लागून राहिलेल्या नासाच्या ‘आर्टेमिस-१ ” या चांद्र मोहिमेच्या दुसऱ्या प्रक्षेपणाच्यावेळीही इंधन गळती झाली.त्यामुळे दुसरा प्रयत्न पुन्हा अपयशी ठरला आहे.शास्त्रज्ञांच्या अनेक प्रयत्नांनंतरही ही गळती थांबवता आली नाही. त्यानंतर नासाच्या अधिकाऱ्यांनी रॉकेट प्रक्षेपण स्थगित करून त्याची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाच दिवस आधीही इंधन गळतीमुळे हे अभियान नियोजित वेळेच्या पुढे ढकण्यात आले होते. नासाचे हे महत्त्वाकांक्षी मिशन फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केले जाणार आहे.मानवयुक्त मोहिमेअंतर्गत नासाचे हे ३२२ फुट लांबीचे पहिले रॉकेट म्हणजेच अंतराळ यान आहे, जे फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून निघून चंद्राभोवती फिरून काही महत्त्वाची माहिती नासाला पाठवेल.
यामध्ये स्पेस लॉन्च सिस्टम- एसएलएस वापरण्यात येत आहे.या मोहिमेच्या यशानंतर नासा आर्टेमिस-२ आणि आर्टेमिस-३ मोहिमांवर काम करेल.आर्टेमिस ३ मिशन अंतर्गत, २०२४ मध्ये नासा तब्बल ५० वर्षांनंतर पुन्हा चंद्रावर मानव पाठवणार आहे. मात्र त्यासाठी आर्टेमिस-१ मिशन यशस्वी होणे खूप महत्वाचे आहे. युरोपियन स्पेस एजन्सी, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी देखील नासाच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत सामील आहेत.आर्टेमिस-१ चे रॉकेट आणि ओरियन कॅप्सूल बोइंग कंपनी (बोईंग को-बीए.एन) आणि लॉकहीड मार्टिन कॉर्प (एलएमटी.एन) यांनी संयुक्तपणे नासासोबतच्या करारांतर्गत आर्टेमिस-१ विकसित केले आहे. परंतु इंधन गळतीमुळे आर्टेमिस-१ शास्त्रज्ञांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami