बंगळुरू- अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थने (नासा) ‘निसार उपग्रह’ इस्त्रोकडे सोपवला. अमेरिकन हवाई दलाच्या विमानाने हा उपग्रह बुधवारी भारतात आणण्यात आला. यूएस एअर फोर्सचे सी-१७ विमानाने हा उपग्रह बेंगळुरूमध्ये आला. नासाने या उपग्रहाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले. त्यानंतर हा उपग्रह पुढील काम आणि लाँचिगसाठी इस्त्रोकडे पाठवण्यात आला. आता इस्त्रो यावर काम करणार आहे. दरम्यान, २०२४ मध्ये या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार आहे.