न्यूयॉर्क – तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नासाची स्पेस क्स क्रू-6 मोहीम एक दिवसासाठी लांबणीवर पडली. स्पेस-एक्स फाल्कन-9 रॉकेटच्या बिघाड झाल्यामुळे त्याचे प्रक्षेपण ऐनवेळी टाळले. आता ते अमेरिकेच्या फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर क्रमांक 39 एहून भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या मंगळवारी दुपारी 12.45 वाजता प्रक्षेपित होईल. नासाने आपल्या निवेदनाद्वारे म्हटले की, ग्राउंड सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे क्रू-6 चे प्रक्षेपण झाले नाही. फाल्कन-9 रॉकेट 4 अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत पोहोचवणार होते. या मोहिमेत नासाच्या दोन, रशियाच्या एक आणि अमेरिकेच्या एका अंतराळवीराचा समावेश होता. हे अंतराळपटू 6 महिन्यांपर्यंत अतंराळावर राहणार आहेत. तिथे ते हार्ट मसल टिश्यू, मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मानवी पेशी आणि टिश्यू प्रिंट करणाऱ्या बायोप्रिंटरचे परिक्षण करणार आहेत. तसेच औषध उत्पादनाच्या तंत्रज्ञानावरही रिसर्च करतील. क्रू-6 मोहिमेतील 4 अंतराळपटूंमध्ये नासाच्या स्टीफन बोवेन आणि वॉरेन वुडी होबर्ग यांचा समावेश आहे. याशिवाय अमेरिकेच्या सुलतान अल्नेयादी व रशियन अंतराळ संशोधन संस्था रोस्कोस्मोसच्या अँड्री फेडेएव्ह यांचाही या मोहिमेत समावेश आहे.