संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

नाशिक शहरात ३८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – नाशिकमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे चित्र चांगले आहे, परंतु पुढील दहा दिवसांत पाऊस न झाल्यास पाणीकपात करावी लागेल, अशी परिस्थिती आहे. कारण धरणांत शहराला पुढील ३८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.

गंगापूर धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी अडीच टक्के पाणीसाठा कमी आहे. तर मुकणे धरणात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण साडेसहा टक्के पाणीसाठा अधिक आहे. मात्र महापालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक ५६०० दलघफू पाण्याची गरज असते. त्यापैकी साधारण ७१२ दलघफू पाणीसाठा गंगापूर समूहात शिल्लक आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये नाशिक शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. त्यावेळी जून महिनाअखेरीस गंगापूर धरणात अवघा १३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत यंदा जून अखेरीस २७ टक्के म्हणजे सरासरी दुप्पट पाणीसाठा आहे. त्यामुळेच पुढील ३८ दिवस पुरेल इतका पाणीसाठा निश्चित आहे. परंतु जुलैच्या पंधरवड्यात पावसाने हुलकावणी दिली, तर नाशिक शहरात महापालिकेकडे पाणी कपातीशिवाय पर्याय नसेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami