संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

नाशिकातून आणखी एकापीएफआय पदाधिकारी ताब्यात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक- गेल्या काही दिवसांपासून मध्यंतरी नाशिकसह देशभरातून ताब्यात घेतलेल्या पीएफआय कार्यकत्यार्र्ंंना न्यायालयात हजर केले असताना आज सकाळी पुन्हा एका पीएफआय पदाधिकार्‍याला एटीएसने ताब्यात घेतले असून त्यास न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यामुळे पीएफआयची पाळेमुळे नाशिकमध्ये खोलवर रुजल्याचे या प्रकरणावरून समोर येत आहे.

महिनाभरापूर्वी राष्ट्रीय तपास संस्था व एसटीएसने देशभरात छापेमारी केल्यानंतर केंद्र सरकारने देखील गंभीर दखल घेत पीएफआय संघटनेवर बंदी घातली. त्यानंतर राज्यातील अनेक भागातून देखील पीएफआय पदाधिकार्‍यांना एटीएसने ताब्यात घेतले. तर राज्यातील जिल्ह्यात असलेल्या पीएफआयच्या कार्यालयांना देखील टाळे ठोकण्यात आले. मात्र त्यानंतर देखील एटीएसचे कारवाई सुरु असून नाशिकमधून पीएफआयच्या आणखी एका सदस्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे पीएफआय प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami