संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

नाशिकमध्ये ८ शाळा अनधिकृत! ७ दिवसांत बंद करण्याचे आदेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – शाळा सुरु झाल्या असतानां काही अनधिकृत शाळा देखील नाशिकमध्ये सुरु असल्याचे समोर आले आहे. नाशिकमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मुलांच्या शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता अनधिकृत शाळांची पाल्यांकडून निवड झाली असल्यास पुढे पाल्यांची फसगत होऊ शकते. कारण मनपा प्रशासनाकडून शहरातील दहा शाळांना अनधिकृत असल्याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे पालकांसहित संबंधित शाळा प्रशासनांचे धाबे दणाणले आहेत.

आजपासून शाळा सुरु झाल्या असून मोठ्या उत्साहात मुलांनी शाळेत प्रवेश करत धमाल केली. यात सगळ्यात नाशिक शहरातील आठ शाळा सुराक्षितेतेच्या कारणास्तव तात्काळ बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या अनधिकृत शाळा त्वरित बंद करण्याची नोटीस महापालिकेच्या शिक्षण विभागाने बजावली आहे. अन्यथा प्रत्येक दिवसाला १० हजार रुपये दंड याप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिला आहे. शासनाच्या आरटीई २००९ नुसार परवानगीशिवाय शाळा सुरू करता येत नाही. मात्र, तरीही नाशकात अशा ८ शाळा बेकायदेशीररीत्या सुरू आहेत. त्यामुळे या शाळा तत्काळ बंद कराव्या आणि त्या बंद केल्याचा अहवाल मनपा शिक्षण विभागाच्या कार्यालयात सादर करावा. असे शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. तसेच येत्या सात दिवसांत या शाळा बंद न केल्यास नियमानुसार एक लाख रुपये दंड त्याचप्रमाणे शाळा सुरू ठेवल्यास प्रत्येक दिवसासाठी १० हजार रुपये दंड या प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शहरातील खैरुल बन्नत इंग्लिश मिडीयम स्कूल (जयदीप नगर, नाशिक), गॅलेक्सी इंग्लिश मिडियम (टाकळी राेड), विबग्याेर राईस स्कूल (समर्थनगर), विजय प्राथमिक स्कूल (रायगड चाैक), दि बुद्धीष्ट इंटरनॅशनल स्कूल (नाशिक राेड), वडाळा आणि पाथर्डी या तीन अशा आठ शाळाअनधिकृत असून,त्यांना नाेटीस बजावण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami