नाशिक – शहरातील वडनेर-दूमाल रोडवरील एम. के. फर्निचर मॉल आणि गोदामाला पहाटे ३ च्या सुमारास भीषण आग लागली. त्यात बाजूची ४-५ घरे आणि काही वाहने जळून खाक झाली. १५ ते २० जण वेळीच बाहेर पडल्याने ते सुदैवाने वाचले. अग्निशामक दलाच्या जवानांनी ४ बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
नाशिकच्या वडनेर-दूमाल रोडवर एम. के. फर्निचर मॉल आहे. या मॉलला आणि गोदामाला पहाटे आग लागली. लाकडी सामानामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. तिच्या विळख्यात बाजूची चार-पाच घरे आणि वाहनेही सापडली. आग लागली तेव्हा गोदामात १५ ते २० जण होते. मात्र ते वेळीच बाहेर पडले. त्यामुळे जीवित हानी टळली. नागरी वस्तीत फर्निचरच्या गोदामाला लागलेल्या आगीत परिसरातील घरे आणि वाहने जळून खाक झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. आगीचे नेमके कारण समजलेले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.