संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

नाशिककरांना घरबसल्‍या पाणीपट्टी मिळणार; महापालिकेकडून ॲपची चाचणी

faucet, sink, tap-3240211.jpg
Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – महापालिकेच्‍या पाणीपट्टी विभागाने पाणीपट्टी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक ॲप विकसित केले आहे. सध्या शहरातील विविध भागांत या ॲपची चाचणी केली जात असून यशस्‍वी चाचणीनंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. मग वापरकर्त्यांना घरबसल्‍या पाणीपट्टी उपलब्‍ध होईल आणि रक्‍कमही घरबसल्या ऑनलाईन स्वरूपात भरता येईल.

महापालिका क्षेत्रात सुमारे दोन लाख बारा हजार नळजोडण्या आहेत. त्यासाठी पाणीपट्टी विभागाला साडे तीनशे कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असताना अवघ्या ९६ कर्मचाऱ्यांवर कामकाजाची जबाबदारी आहे. परिणामी तोकड्या मनुष्यबळामुळे पाणीपट्टी वाटपाचे काम पूर्ण क्षमतेने होत नाही. तर, दुसरीकडे कोट्यवधींची पाणीपट्टी थकीत असून त्यामुळे महापालिकेचा महसुल बुडत असतो. या सर्व पार्श्वभूमीवर हे ॲप प्रभावी ठरणार, असे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेने विकसित केलेल्‍या या ॲपचे काम आता अंतिम टप्प्यात असून विविध भागांतील नागरिकांच्या घरी जाऊन त्याची चाचणी सुरू आहे. नागरिकांना हे ॲप पूर्ण क्षमेतेने उपलब्‍ध करून दिले जाणार आहे. ॲपद्वारे नागरिक पाणी मीटरचे छायाचित्र काढून त्यावर अपलोड करू शकतील. नियंत्रण कक्षाद्वारे छायाचित्राची तपासणी केल्‍यानंतर ग्राहकांना त्‍यांच्‍या व्हॉट्सऍप क्रमांकावर एका तासात बिल पाठवले जाईल. तसेच महापालिका कर्मचारीदेखील प्रत्‍यक्षस्‍थळी जाऊन उलट पडताळणी करू शकतील. दरम्यान, ॲप कार्यान्‍वित झाल्‍यानंतर गैरप्रकार आढळल्‍यास ग्राहकांना एक पटीने दंड आकारला जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami