संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

नाशकात कोथिंबिरचे दर कडाडले लिलावात एका जुडीला १९० रुपये!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कोथिंबिरीचा वापर हा होतच असतो. आज हीच कोथिंबिर पुन्हा तिच्या वाढलेल्या किंमतीमुळे चर्चेत आली आहे. सध्या नाशिकच्या बाजारात कोथिंबीरीला सोन्याचा भाव आला नाशिक बाजारसमितीत कोथिंबिरीचे भाव कमालीचे कडाडले आहेत. लिलावामध्ये कोथिंबिरीला शेकडा १९ हजार रुपये भाव मिळाला आहे. म्हणजेच कोथिंबिरीची प्रत्येकी एका जुडीला तब्बल १९० रुपये इतका विक्रमी भाव मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतातला माल मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यामुळे बाजारात कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने त्याचा परिणाम कोथिंबिरीच्या भावावर झाला आहे. सध्या बाजारात कोथिंबिरीला सोन्याचा भाव आला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशकात सातत्त्याने पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी शेतात पाणी साचत असल्याने अन्न भाज्यांप्रमाणे कोथिंबीर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. उत्पादन घटल्याने मागील २ आठवड्यापासून कोथिंबिरीचे भाव वाढायला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात १० ते १२ हजार रुपये शेकडा, त्यानंतर २ दिवसांपूर्वी १६ हजारांवर पोहचलेल्या भावाने आता १९ हजारांचा उच्चांकी दर गाठला आहे. येत्या काळात कोथिंबिरीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने कोथिंबीरीचा जपून वापर करावा लागणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami