संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा दणका! दोन आठवड्यांत बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जुहूमधील अधीश बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित करावे यासाठी कालका रिअर इस्टेट कंपनी मार्फत याचिका केली होती. या याचिकेवर आज कोर्टाने राणेंच्या जुहूमधील अधीश या ७ मजली बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित होऊ शकत नाही असे म्हणत बंगल्यातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.हायकोर्टाने पुन्हा याचिका दाखल केल्याने १० लाखांचा दंड ठोठावण्याबरोबरच बेकायदा बांधकाम दोन आठवड्यात पाडण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबतचे वृत्त असे की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यातील बांधकाम उच्च न्यायालयाने मंगळवारी बेकायदा ठरवले आहे. आदेशाला स्थगिती देण्यास नकार देताना हे बेकायदा बांधकाम दोन आठवड्यांत पाडण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. बांधकाम नियमित करण्यासाठी राणे यांनी मुंबई महानगरपालिकेकडे दुसऱ्यांदा केलेला अर्ज चुकीचा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी न्यायालयाने राणे यांना १० लाखांचा दंड ठोठावला आहे. एफएसआय आणि सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा ठपका नारायण राणेंवर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर आज उच्च न्यायालयानेही आपल्या आदेशात महापालिकेला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. येत्या दोन आठवड्यात वाढीव बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई करावी. कारवाईचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. हायकोर्टाने पालिकेवर तीव्र आक्षेप घेतला. महापालिका कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे आता योग्य दखल घ्यावी लागेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान,रमेश धानुका आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठाने २३ ऑगस्ट रोजी निकाल राखून ठेवला होता. यानंतर उच्च न्यायालयाने आज ही याचिका फेटाळून लावत कालका रिअल इस्टेट कंपनीला दंड ठोठावला आहे.

विशेषतः नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू भागात समुद्र किनाऱ्यावर हा बंगला असून सीआरझेडचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशी याचिका संतोष दौंडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याप्रकरणी आज सुनावणी पार पडली असून, एफएसआय आणि सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. हा नारायण राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami