फुंटुआ – नायजेरियाच्या फुंटुआ भागातील एका मशिदीत नमाज पठण करत असताना हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात इमामसह 12 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. हल्लेखोराने काही लोकांचे अपहरणही केले असून त्यांच्या कुटुंबीयांकडे खंडणीची मागणी केली आहे.लोकांना शेतीसाठी परवानगी घेण्यास आणि संरक्षण शुल्क भरण्यास सांगण्यात आले आहे.
मोटारसायकलवरून आलेले काही हल्लेखोर मगुमजी मशिदीत पोहोचले. त्यांनी आत घुसून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. लोक प्रंचड घाबरले होते. जीव वाचवण्यासाठी सर्वजण इकडे तिकडे धावू लागले. 12 जणांना गोळ्या लागल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी काही लोकांना धाक दाखवून झुडपात नेले. यानंतर ते कुठे गेले हे कळले नाही. मला आशा आहे की सर्वजण ठीक असतील. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मुहम्मदु बुहारी म्हणाले की, द्व्ोषाच्या भावना असलेल्यांनी असे घृणास्पद कृत्य केले आहे आणि लोकांची हत्या केली आहे. अशा द्व्ोषी लोकांसमोर देश कधीच झुकणार नाही आणि त्यांच्यावर विजय मिळवून दाखवेल.