संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

नायजेरियामध्ये बसला भीषण अपघात! २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अबूजा – नायजेरियामध्ये एका भरधाव बसने दुसऱ्या वाहनाला धडक दिल्याने लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नायजेरियाच्या ओयो राज्यातील इबाराप्पा भागात हा भीषण अपघात झाला.

इबारप्पा जिल्ह्याचे अध्यक्ष गॅबेन्ग ओबेलिओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांमध्ये समोरासमोर भीषण टक्कर होऊन यातील एका बसला आग लागली. या आगीत बसमधील २० हुन अधिक प्रवासी होरपळून गंभीर जखमी झाले त्यातील २० जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोचले. अग्निशमन दलाला ताबडतोब आग विझवता आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली. या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत . त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आल्याचे ओबेलिओ यांनी सांगितले. तसेच नायजेरियातील रस्ते खराब आहेत आणि या खराब रस्त्यावरून वेगाने वाहने चालवली जातात . त्यामुळेच असे भीषण अपघात होतात असेही ते म्हणाले. यापूर्वी जुलै मध्ये कदुना राज्यात झालेल्या ३ वाहनांच्या भीषण अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला होता . त्यानंतर हा दुसरा भीषण अपघात आहे .

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami