संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

नातवाच्या कस्टडीवर आजी-आजोबांचा
अधिकार! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – कोरोनाच्या काळात अनाथ झालेल्या नातवाच्या ताब्यावर वडिलांकडील आजी-आजोबांचा अधिकार असेल. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
दरम्यान, कोरोनामुळे अनाथ झालेल्या नातवावरचा अधिकार आईकडील आजी-आजोबांचा आहे की वडिलांकडील आजी-आजोबांचा आहे, याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक खटला सुरू होता. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून नातवाचा ताबा वडिलांकडील आजी-आजोबांकडे सोपवण्यात आला आहे. विशेषतः हे प्रकरण 2021चे आहे. मुलाच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि अवघ्या एका महिन्यानंतर आईचा मृत्यू झाला. मुलाचे वडील अहमदाबादचे तर आई दाहोदची होती. मुलाची आई वारल्यावर ते मूल दाहोदला गेले आणि आईकडील आजी-आजोबांनी त्याला आपल्याजवळ ठेवले.
दरम्यान, वडिलांकडील आजी-आजोबांनी नातवाला परत मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात मुलाला न्यायमूर्तींनी विचारले की त्याला कुठे आवडले, त्याचे उत्तर दोन्ही ठिकाणचे होते. दरम्यान, त्या मुलाच्या काकूने सांगितले की, तिला स्वतःचे कोणतेही मूल नाही, त्यामुळे मुलाचा ताबा तिच्याकडे सोपवावा. त्याप्रमाणे तिच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, वडिलांकडील आजी-आजोबांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात युक्तिवाद केला. वयाने मोठा असलो तरी नातवंडांचा सांभाळ करू शकेन. तसेच जर आपण शिक्षणाबद्दल बोललो तर दाहोदच्या तुलनेत अहमदाबादमध्ये शिक्षणाच्या चांगल्या सुविधा आहेत आणि ते स्वतः सक्षम आहेत, अशा परिस्थितीत सुप्रीम कोर्टाने त्या मुलाला वडिलांकडील आजी-आजोबांकडे सोपवण्याचा हा महत्वपूर्ण निर्णय दिला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami