संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

नाट्यनिर्मात्या निलोफर सागर यांची गळफास घेऊन आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- नाट्य निर्मात्या निलोफर सागर यांनी शुक्रवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या ४६ वर्षांच्या होत्या. कफ परेड येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. निलोफर आईसोबत राहत होत्या.

निलोफर सागर गुरुवारी रात्री बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांनी आतून कुलूप लावले होते. शुक्रवारी दुपारी २ वाजले तरी त्या बाहेर आल्या नाहीत. म्हणून आईने दरवाजा ठोठावला. पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी निलोफरची बहीण यास्मिन कपाडियाला फोन करून बोलावून घेतले. त्यांनी डुप्लिकेट चावी बनवून दरवाजा उघडला. तेव्हा निलोफर पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. ओढणी आणि टी-शर्टने त्यांनी गळफास घेतला. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन जीटी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला. याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami