कोहिमा- नागालँड या ईशान्य भारतातील राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय कॉंग्रेसने आपली २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये नागालँड प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष के.थेरी यांना दिमापुर-१विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहे.
ही उमेदवार यादी जाहीर करण्याच्या एक दिवस आधी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची एक बैठक पार पडली.त्यामध्ये या पहिल्या यादीतील उमेवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.त्यानंतर काल शनिवारी कॉंग्रेसने ही उमेदवार यादी जाहीर केली. पहिल्या यादीमध्ये कॉंग्रेसने दिमापुर -२ मधून एस.अमेंटो चिस्ती ,दिमापुर- ३ मधून व्ही.लासूह आणि टेनिंग विधानसभा मतदारसंघातून थॉमस यांना उमेदवारी देण्यात आली आहे.नागालँड विधानसभेच्या ६० जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे.