संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

नागपूर जिल्ह्यातील तब्बल १३ पंचायत समितीत भाजपचा एकही सभापती नाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल १३ तालुक्यांमध्ये भाजपला एकही पंचायत समितीवर सभापती होऊ शकला नाही. फक्त दोन तालुक्यात उपसभापती पदावर भाजपला समाधान मानावे लागले आहे.या जिल्ह्यात संख्याबळाच्या आधारावर काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे.

जिल्ह्यातील १३ पंचायत समितींपैकी ९ पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सभापती निवडून आले आहे.तर ३ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झाला आहे.तर एका.तालुक्यात शिंदे गटाचा सभापती झाला आहे. पंचायत समितीमध्ये सभापती,उपसभापती निवडणुकांसाठी भाजपतर्फे कॉंग्रेसच्या नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.तर राष्ट्रवादीचेही काही नेते संपर्कात होते. कॉंग्रेसला सभापतीपद मिळालेल्या पंचायत समित्यांमध्ये जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण,कामठी, सावनेर, कळमेश्वर पारशिवनी, उमरेड, मौदा, कुही,भिवापूर या पंचायत समितींचा सामवेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती झालेली पंचायत समित्यांमध्ये नरखेड, काटोल व हिंगणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विजय मिळवला आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटाला रामटेक पंचायत समितीत सभापती पद मिळाले आहे. यासोबतच रामटेक आणि मौदा तालुक्यात भाजपला उपसभापती पद मिळाले आहे.काल झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये काटोल व नरखेड येथील पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती विजयी झाले आहेत.यात नरखेड पंचायत समितीमध्ये महेंद्र गजबे हे सभापतीपदी बिनविरोध तर उपसभापती पदी माया प्रवीण मुढोरिया ६ विरुद्ध २ मतांनी विजय झाले. तर काटोल पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय डांगोरे हे सभापती तर उपसभापतीपदी निशिकांत नागमोते हे बिनविरोध निवडून आले आहेत

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami