संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

नागपूरमध्ये १२ आणि १३ वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहे. एका तरुणाने मैत्रीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले, तर दुसऱ्या घटनेत मुलीच्या आजोबानेच नातीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

पहिली घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत व्हॉट्सऍप चॅटिंगच्या माध्यमातून २४ वर्षीय आरोपी मनीष लिंबाळेने मैत्री केली. दोघेही एकाच वस्तीत राहत होते. काही दिवसांनी दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि २४ एप्रिलला मध्यरात्री मनीषने मुलीला आपल्या घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याने तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि याबाबत कोणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र पीडितेने काही दिवसांनी आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईने रविवारी, ५ जून रोजी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कार्यालयात कंत्राटी कर्मचारी असलेल्या मनीष लिंबाळेविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी, ६ जून रोजी मनीषला पॉक्सो आणि आयपीसीच्या ३७६ कलमांतर्गत अटक केली.

तर, दुसरी घटना कपिलनगर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय पीडितेची आई गर्भवती असल्याने ती सध्या आपल्या माहेरी आली होती. आपण गर्भवती असल्यामुळे आई मुलीला आजोबांकडे झोपायला पाठवत होती. काही दिवसांपूर्वी मुलीच्या आईने आजोबा आणि नातीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर कुटुंबात याबाबत चर्चा झाली. मात्र, कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने इतर सदस्यांनी हे प्रकरण तिथेच थांबविले. परंतु पीडितेने आणि तिच्या आईने पोलीस तक्रार देण्याचा निर्णय घेतला. अखेर सोमवारी, ६ जून रोजी कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो आणि आयपीसीच्या कलम ३७६ अन्वये पीडितेच्या आजोबाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami