संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

नागपूरच्या 8 जलकुंभातून आज पाणीपुरवठा बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – मनसर वीज उपकेंद्रात दुरुस्तीसाठी 24 ऑगस्टला चार तास वीजपुरवठा खंडित राहणार असल्याने नवेगाव खैरी येथील पंपिंग स्टेशनही बंद राहणार आहे. त्यामुळे गोधनी पेंच चार जलशुद्धीकरण केंद्राला चार तास पाणीपुरवठा होणार नाही. परिणामी बुधवारी 8 जलकुंभातून पाणीपुरवठा बंद राहील.

मनसर वीज उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे नवेगाव खैरी येथून गोधनी येथील जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा होणार नाही. परिणामी आसीनगर, लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर व नेहरूनगर झोनमधील 8 जलकुंभांचा पाणीपुरवठा बंद राहील. यात नारा नारी, जरीपटका, धंतोली, लक्ष्मीनगर, नालंदानगर, श्रीनगर, जुने-नवे ओंकारनगर, म्हाळगीनगर, हुडकेश्वर व नरसाळा या जलकुंभातून पाणीपुरवठा होणार नाही व टँकरने पाणीपुरवठाही होणार नाही, अशी माहिती ओसीडब्लू, महापालिकेने दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami